कळमसरे येथे गोठ्याला आग ; लाखोंचे नुकसान (व्हिडिओ)

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे येथील मारवाड रोडलगत असलेल्या एका गोठ्याला दुपारी अचानक भीषण आग लागली. या आगीत साठवून ठेवलेल्या चारासह अवजारे जळून खाक झाली आहे.

 

सविस्तर वृत्त असे की,कळमसरे येथील यादव किसन चौधरी यांच्या मारवड रस्त्यालगत असलेल्या शेतातील गोठ्याला काल दुपारी अचानक आग लागल्याने वर्षभरासाठी साठवून ठेवलेला गुरांचा चारा, शेतासाठी लागणारी महागडी अवजारे, ठिबक तसेच पाईप्स रासायनिक खतांच्या थैल्या जळून पूर्णतः नष्ट झाल्या यामुळे यादव किसन चौधरी या शेतकऱ्याचे सुमारे अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेल नाही. शेतातील मेंढपाळ व साल दार यांच्या मदतीने आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, मात्र भर उन्हाचा तडाखा व जोराचा वारा सुरू असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. परिणामी क्षणार्धात होत्याच नव्हते झाले. एका मिनिटात डोळ्यासमोर गोठ्यातील साहित्य जळून राख होताना बळीराजा ला पहावे लागले. ते चित्र पाहून, शेतकरी यादव चौधरी व त्यांचे सुपुत्र धनराज चौधरी यांना आश्रू अनावर झाले होते.घ टनेची माहिती तहसील कार्यालयात कळवण्यात आली आणि कार्यालयाकडुन देखील तलाठी गौरव शिरसाठ यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/529003168555660

Protected Content