नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल-डिझेल दरवाढ केली आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये भाव वाढले आहेत. जाणून घ्या आजचे दर काय आहेत.
दिल्लीत पेट्रोल आणि डिझेल किमतीत 40 पैसे प्रति लीटरची वाढ झाली आहे. दिल्लीत आता पेट्रोल 103.81 रुपये प्रति लीटर विक्री होत आहे. तर डिझेल 95 रुपये लीटर पार आहे. मुंबईत पेट्रोल 119 रुपयांजवळ पोहोचलं आहे. तर डिझेल 103 रुपयांहून अधिक महाग झालं आहे. मागील चार महिन्यांपासून इंधन दर स्थिर होता. परंतु निवडणुकांनंतर आता सरकारी तेल कंपन्यांनी दररोज पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यास सुरुवात केली. एका आठवड्याआधी जवळपास 137 दिवस इंधन दरात कोणतेही करण्यात आले नव्हते. मागील 10 दिवसांत जवळपास 7 रुपयांहून अधिक पेट्रोल महाग झालं आहे. तर डिझेल दरातही तितकीच वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल 103.81 रुपये आणि डिझेल 95.07 रुपये प्रति लीटर; मुंबईमध्ये पेट्रोल 118.83 रुपये आणि डिझेल 103.07 रुपये प्रति लीटर आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 109.34 रुपये आणि डिझेल 99.42 रुपये प्रति लीटर झाले आहे.