अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मयत झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत कण्यासाठी शिक्षकबांधवांनी मदतीचा हात पुढे केला असून मयत शिक्षकांच्या कुटुंबियांना मयत निधी देण्याचा ठराव विशेष सभेत संमत करण्यात आला.
दि. १ मे रोजी अमळनेर तालुक्यातील शिक्षक समन्वय समिती तसेच सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, केंद्रप्रमुख संघटना व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यावेळी अमळनेर तालुक्यातील मयत झालेले शिक्षक यांच्या घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने त्यांच्या मागे असलेल्या कुटुंबावर जे आर्थिक संकट कोसळते त्यातून सावरण्यासाठी मयत शिक्षकाच्या परिवाराला आर्थिक मदतीचा हातभार म्हणून तालुक्यातील प्रत्येक शिक्षकाने काहीतरी योगदान दिले पाहिजे या उदात्त हेतूने पुढील काळात प्रत्येक शिक्षकाने मयत व्यक्तीच्या परिवाराला दरमहा किमान १५० रुपये मयत निधी देण्याचा ठराव संमत करण्यात आला. याप्रसंगी केंद्रप्रमुख संघटनेचे गोकुळ पाटील, समन्वय समितीचे मधूकर आबा चौधरी, राजेंद्र सोनवणे, वाल्मिक पाटील, जितेंद्र शेटे, अशोक इसे, धिरज पाटील, अरुण मोरे, भानुदास पवार, किरण शिसोदे, किरण बाविस्कर, विजय चव्हाण, राजू कोळी, दिनेश मोरे, धनंजय सूर्यवंशी, गोकुळ साळुंखे, हिंमतराव पाटील, हिरालाल पाटील, विजय पाटील, सुनील मोरे, संजीव पाटील, राजेंद्र लोहारे, संजय भगवान पाटील, दिलीप सोनवणे, सतिष पाटील, प्रेमराज पवार, दत्तात्रय सोनवणे, यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते