मनपा आवारात उगवत्या सुर्याला अर्घ्य देवून नववर्षाचे स्वागत !

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महापालिकेच्या आवारात संस्कार भारतीच्या वतीने गुढीपाडवा पहाट कार्यक्रम घेण्यात आला.  उगवत्या सुर्याला अर्घ्य देवून नववर्षाची सुरूवात करण्यात आली. यावेळी महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते गुढीचे पुजन करण्यात आले.

जळगाव महापालिकेच्या आवारात पहाटेच्या मंगल वातावरणात सुवासिनींनी केलेले गुढीपूजन व त्यांच्यासोबत मान्यवरांनी उगवत्या सूर्याला दिलेले मंचावरून साधकांनी सुरेल सादर केलेली स्व. लता मंगेशकर यांची गाजलेली गीते अशा प्रसन्न मुहूर्तावर संस्कार भारतीची गुढी पाडवा पहाट साजरी करण्यात आली. जळगाव महानगरपालिकेच्या प्रांगणातील कार्यक्रमाची सुरुवात ‘ओम नमोजी आद्या’ या संत ज्ञानेश्वरांच्या रचनेने झाली तर ‘जयोस्तुते श्री महान मंगले’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रचनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांची गाजलेली गीते हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. कार्यक्रमात सामील झालेले कलासादक संपदा छापेकर, स्वाती डहाळे, अथर्व मुंडले, निळकंठ कासार, दिलीप चौधरी, राजेंद्र माने, गिरीश मोघे यांनी सुरेल गीते सादर केली. अभ्यासपूर्ण निवेदन वैदेही नाखरे यांनी केले. कथक कला मंदिरच्या रमा करंजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कार भारती गीत सादर करण्यात आले. यात रसिका ढेपे, निधी गायकवाड, वि. प्रा. तळेले, सानिका शेठ, मिताली सपकाळे, समृद्धी ब्राह्मणे, देवश्री पाटील, कुंतल वाघमारे, अनुष्का पोद्दार, मुक्ता नाईक, श्रावणी बावस्कर यांनी सामूहिक नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुढीपूजन महापौर जयश्री महाजन, ज्येष्ठ साहित्यिका मायाताई धुप्पड, गीता रावतोळे, रेखा लढे, सुनंदा सुर्वे, कल्पना नेवे, रमा करंजगावकर यांच्याहस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपमहापौर कुलभूषण पाटील, अनिल अभ्यंकर, मोहन रावतोळे, डॉ. सुभाष महाले, डॉ. पुरुषोत्तम पाटील, चिंतामण पाटील, सुहास देशपांडे, किशोर सुर्वे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content