पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरात आज सिंधी बांधवांचा चेट्रीचंड्र महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
सिंधीवत दिवस म्हणुन पुज्य सिंधी जनरल पंचायततर्फे सकाळी ११ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साई झुलेलाल यांची महाआरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच शहरातील सिंधी कॉलनी परिसरातून सुमारे एक हजार मोटरसायकलची भव्य अशी रॅली काढण्यात आली. सदरची रॅली सिंधी कॉलनी ते जारगांव चौफुली ते महाराणा प्रताप चौक ते भुयारी मार्ग ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सिंधी कॉलनीत रॅलीची सांगता करण्यात आली.
या महोत्सवात शहरातील तसेच परिसरातील लाखो सिंधी बांधव, भगिनी, युवक, युवती यांनी उपस्थिती दिली. मोटरसायकल रॅली दरम्यान पाचोरा पोलिस स्टेशनचे ट्राफीक पोलिस हवालदार यांनी चोख बंदोबस्त ठेवत कुठेही रहदारीस अडथळा निर्माण होवु दिला नाही.