Home क्राईम शहरातून पुन्हा एकदा चोरट्यांनी लांबवली दुचाकी

शहरातून पुन्हा एकदा चोरट्यांनी लांबवली दुचाकी

0
51

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आकाशवाणी चौकातून तरूणाची दुचाकी लांबवली आहे. याबाबत  जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, “जळगाव शहरातील निवृत्तीनगर येथे निलेश अशोक ठाकरे वय ३४ हे वास्तव्यास आहेत. बुधवार, दि.२३ मार्च रोजी ते कामानिमित्ताने त्यांच्या (एमएच १९, एआर ९७७२) या क्रमांकाच्या दुचाकीने आकाशवाणी चौकात आले होते. आकाशवाणी चौकात त्यांनी त्यांची दुचाकी उभी केली होती. काम आटपून पुन्हा दुचाकीजवळ आले असता त्या जागेवर त्यांना दुचाकी मिळून आली नाही.

दोन दिवस सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने याप्रकरणी निलेश ठाकरे यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भरत चव्हाण करीत आहेत.


Protected Content

Play sound