Home क्राईम धार्मीक भावना दुखावणारी पोस्ट टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल

धार्मीक भावना दुखावणारी पोस्ट टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0
42

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सोशल मिडीयावर धार्मीक भावना दुखावणारी पोस्ट टाकल्याप्रकरणी एक जणाविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मिडीयावरील व्हाट्स ऍप ग्रुपवर समाजात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची धार्मिक भावना दुखाविणारी पोस्ट व्हायरल केली. त्यामुळे एका समाजाची धार्मीक भावना दुखावल्या गेल्या आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात एक तरुणाने तक्रार दिली असून पोस्ट व्हायरल करणार्‍याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निलेश भावसार हे करीत आहे.


Protected Content

Play sound