जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जि.प शाळा वडगाव ( हडसन ) शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका गायत्री पाटील यांना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिक्षक संघातर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
काल मंगळवार दि. २२ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगराध्यक्षा मंगला पाटील यांच्या हस्ते गायत्री पाटील यांना सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्रक,शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्र पाटील, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, संजय गरुड, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, मगन पाटील आदी उपस्थित होते.
गायत्री पाटील यांनी कोरोना काळात शाळा बंद पण शिक्षण सुरू, घरोघरी शिक्षण आपल्या दारी,गल्ली मित्र भौगोलिक गट अध्यापन पद्धती असे उपक्रम राबवून विद्याथ्यांची गुणवत्ता वाढविली याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हास्तरीय आदर्श गुणवंत शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल वडगाव (हडसन) गावाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामस्थ ,पालक, शि.वि.अ.विनायक ठाकुर साहेब, केंद्रप्रमुख धीरजसिंग पाटील, मुख्याध्यापक सरदारसिंग पाटील तसेच भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगावचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे सर, पुस्तक भिशी परिवार पाचोरा, सदाबहार सखी मंच, आप्तेष्ट यांच्यातर्फे गायत्री पाटील यांना अभिनंदनाच्या वर्षावासह पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.