कोटेच्या महिला महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व पालक मेळाव्याचे आयोजन

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व पालक मेळाव्याचे आयोजन यशस्वीरित्या संपन्न झाले.

मंगळवार, दि. 22 मार्च रोजी महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत रांगोळी स्पर्धा व पोस्टर स्पर्धेचे फित काटून उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी कबचौ उमवि जळगावचे रजिस्टार डॉ.किशोर पवार, सरस्वती विद्या प्रसारक मंडळ, भुसावळ आणि संस्थेच्या अध्यक्षा पद्मा कोटेचा, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा,  उपप्राचार्य डॉ.जे.व्ही.धनवीज, उपप्राचार्य प्रा.वाय.डी.देसले आदिंची उपस्थिती होती.

पालक मेळाव्याचे प्रमुख वक्ते नोबेल फाउंडेशन जळगावचे, संस्थापक जयदीप पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्षा प्राचार्या डॉ.मंगला साबद्रा, समिती प्रमुख प्रा.एस.बी. नेतनराव आदि मंचावर उपस्थित होते.

जयदीप पाटील यांनी ‘स्वातंत्र्योत्तर भारताचे अमृत महोत्सव वर्ष’, ‘पालक, पाल्य व शिक्षक यांचे योगदान : एक चिंतन’ या विषयावर पालक व विदयार्थींनीशी संवाद साधला. त्यामध्ये म्हणाले की, “समाजामध्ये नावलौकिक करण्यासाठी संघर्ष करावा लागतोच पण पुरूषांच्या तुलनेमध्ये महिलांना अधिक संघर्ष करावा लागतो. स्त्री ही पुरूषापेक्षा अधिक शिस्तप्रिय असते. तिच्यामध्ये निर्णयक्षमता अधिक असते. ज्ञान व कौशल्याच्या आधारावर इतिहासांमध्ये स्त्रियांनी आपले कतव्य सिद्ध केल्याचे दिसून येते. महिलांची काम करण्याची क्षमता पुरुषांपेक्षा जास्त आहे. यश हे केवळ संघर्षातूनच निर्माण होते. त्यासाठी आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण स्वत: आपल्यावर निबंर्ध लावणे गरजेचे आहे. अवांत्तर वाचनाने ज्ञान वाढून चरित्र संपन्न बनण्यास मदत होते. शिक्षणामुळे अशक्य गोष्टी शक्य करता येतात त्यामुळे आपले करिअर बनविता येते. मुलींनी लग्नांनतर सुध्दा शिक्षण घेतले पाहिजे. स्वत:च्या पायावर उभे राहून आपल्या गावाचे, जिल्हाचे, राष्ट्राचे नाव लौकिक करता येते”

कार्यक्रमाचे अध्यक्षा प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा यांनी सांगितले की ‘आमच्या महाविदयालयामध्ये वाचन संस्कार वृध्दिंगत करू.’ पालकमेळाव्याचे सूत्रसंचालन डॉ. व्ही.एस.पाटील यांनी तर आभार समिती सदस्य डॉ.एस.के.अग्रवाल यांनी केले.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्स निमित्त कार्यक्रम

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्स निमित्त घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमामध्ये एकुण १२५ विदयार्थींनीनी सहभाग घेतला. त्यातील विजेत्या विदयार्थींनीची नावे याप्रसंगी वितरीत करण्यात आली.

 

रांगोळी स्पर्धेची पारितोषिकं : –

प्रथम क्रमांक – स्नेहा गजभिये (11 वी विज्ञान)

द्वितीय क्रमांक – कल्पना चौधरी (प्रथम वर्ष संगणक)

तृतीय क्रमांक – रेणुका थोरात (प्रथम वर्ष वाणिज्य)

 

पोस्टर्स स्पर्धेची पारितोषिकं : –

 

प्रथम क्रमांक – आयुषी मराठे (11 वी विज्ञान)

व्दितीय क्रमांक – विदया भोई (तृतीय वर्ष कला हिंदी)

तृतीय क्रमांक – जान्हवी दाभाळे (तृतीय वर्ष कला हिंदी)

 

नृत्य स्पर्धेची पारितोषिकं : –

 

प्रथम क्रमांक – तेजस्वी तायडे ( तृतीय वर्ष  वाणिज्य )

व्दितीय क्रमांक – प्रतिज्ञा मनोरे, रक्षंदा बाविस्कर, अनिता तायडे व मैत्रिणी (प्रथम वर्ष वाणिज्य)

तृतीय क्रमांक – चिन्मयी घन आणि संयुक्ता लाड (तृतीय वर्ष  वाणिज्य)

 

गीतगायन स्पर्धेची पारितोषिकं : –

 

प्रथम क्रमांक  – गायत्री नाटेकर ( एम.ए.हिंदी)

व्दितीय क्रमांक  – अपर्णा चौधरी (एम काँम २)

तृतीय क्रमांक (विभागून) – लावण्या चत्रत ( प्रथम वर्ष कला ), विपर्णा महाले (१२वी विज्ञान)

 

समारोपप्रंसगी संस्थेच्या अध्यक्षा पद्मा कोटेचा, शशी महोनत आणि  महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मंगला साबद्रा यांच्याहस्ते सर्व स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.जे.व्ही.धनवीज, उपप्राचार्य प्रा.वाय.डी.देसले आदि उपस्थित होते. पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.विनोद भालेराव यांनी केले.

सदर ‘क्रिएटीव थींक समिती’ प्रमुख डॉ.व्ही.एस.पाटील, प्रा.अर्चना झिंगरन, पालक मेळावा समिती प्रमुख प्रा.एस.बी. नेतराव, डॉ.एस.के अग्रवाल, प्रा.निलेश गुरूचल, डॉ.गिरीष कोळी, प्रा.विनोद भालेराव, प्रा.रीष सरोदे, प्रा.मनिषा इंगळे, प्रा.सचिन पंडित, प्रा. तल औतकर, प्रा.पूनम सोनवणे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी सुरेश चित्ते, प्रदीप पाटील, नितिन चौधरी, धर्मराज मराठे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Protected Content