Home क्राईम म्हसावद येथे वीजेच्या धक्क्याने वृध्दाचा मृत्यू; एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

म्हसावद येथे वीजेच्या धक्क्याने वृध्दाचा मृत्यू; एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

0
104
death


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गुरांना चारा कापण्यासाठी गेलेल्या म्हसावद येथील वृध्दाचा विजेच्या धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोटन देवराम महाजन (वय-६०) असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील रहिवाशी लोटन महाजन हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. शनिवार १९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ते गुरांना चारा कापण्यासाठी म्हसावद शिवारातील शेतात गेले होते. त्यावेळी शेतातील चारा कापत असतांना बाजूला पडलेल्या विद्यूत तारेचा त्यांना जोरदार धक्का बसला. त्यातच त्यांचा जगीच मृत्यू झाला. नातेवाईकांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. खातीना पठाण यांनी मयत घोषीत केले. रविवारी २० मार्च रोजी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.


Protected Content

Play sound