Home क्राईम महिलेकडे पहात सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणे पडले महागात : तरुणास अटक

महिलेकडे पहात सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणे पडले महागात : तरुणास अटक

0
40

 

यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सांगवी खुर्द येथे महिलेला पाहून लघुशंका करीत मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन एका तरुणाने केल्याची तक्रार संबंधित महीलेने पोलीस ठाण्यात दिली. यावरून त्या तरुणाविरूद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात येऊन या तरुणास पोलीसांनी अटक केली आहे.

या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथे गावाजवळील सांगवी खुर्द ते निमगाव या दोन गावांच्या दरम्यान रस्त्याने महिला जात होती. त्यावेळी यारस्त्यालागत असलेल्या किरण पाटील यांच्या शेताजवळ शनिवारी १२ मार्च २o२२ रोजी सकाळच्या सुमारास संशयीत आरोपी चंदन पंडीत कोळी याने या फिर्यादी महीलेस पाहुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत उघडयावर सार्वजनिक ठिकाणी लघुशंकेसाठी उभा राहीला. हा युवक फिर्यादी महीलेकडे पाहत हसत असल्याचे पाहून फिर्यादी महिलेने या युवकास या कृत्याचा जाब विचारण्यासाठी गेली असता चंदन कोळी यांने त्या महीलेचा डावा हाथ पकडून विनयभंग करीत शिवीगाळ केली .
याघटनेसंदर्भात संबंधित महीलेने संशयित चंदन कोळी याच्या विरूद्ध यावल पोलीस ठाण्यात फ़िर्याद दिली. त्यानुसार या युवकाविरुद्ध भादवी ३५४ , ५०४ , ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत आरोपी चंदन कोळी यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉस्टेबल अशोक जवरे व त्यांचे सहकारी करीत आहे.


Protected Content

Play sound