Home क्राईम शाळेच्या स्वच्छतागृहात विद्यार्थिनीवर बलात्कार

शाळेच्या स्वच्छतागृहात विद्यार्थिनीवर बलात्कार


 

10 01 2013 rape10 3134261 835x547 m
 

बारामती (वृत्तसंस्था) शहरातील एका माध्यमिक विद्यालयातील 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर त्याच शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

 

शहरातील एका माध्यमिक विद्यालयामधील स्वच्छतागृहामध्ये रविवारी ही घटना घडली आहे. याप्रकरणी 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीने बुधवारी 1 मे रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत अल्पवयीन मुलगी ज्या शाळेत शिक्षण घेतेय त्याच हायस्कूलमध्ये आरोपी विद्यार्थी देखील शिकतात. ते या मुलीच्या ओळखीचे आहेत. यापैकी एकाने हायस्कूलच्या आवारातील स्वच्छतागृहामध्ये या विद्यार्थिनीवर बलात्कार केला. तर या आरोपीला अन्य एका विद्यार्थ्याने मदत केल्याची तक्रार या पिडीत विद्यार्थिनीने केली आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound