भुसावळ (प्रतिनिधी) मध्य रेल्वेच्या भुसवाळ मंडळातील ४७ कर्मचारी एप्रिल महिन्यात सेवानिवृत्त झाले आहेत. या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती देय रक्कम व सुवर्ण पदक मिटिंग हॉल मध्ये प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
मध्य रेल्वेच्या भुसवाळ मंडळातील ४७ कर्मचाऱ्यांचा सेवा निवृत्तीनिमित्त ३० एप्रिल रोजी मिटिंग हॉल येथे ११ कोटी १८ लाख ३८ हजार ७९३ रुपयांच्या धनादेश तसेच सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. या वेळी मंडळ रेल प्रबंधक, अपर रेल प्रबंधक मनोज सिन्हा, वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन. डी. गांगुर्डे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या याशिस्वीतेसाठी कार्मिक व लेखा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामकाज पहिले.