*जामनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनीधी* | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल जामनेरात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून महाविकास आघाडीच्या वतीने राज्यपालांचा जाहीर निषेध नोंदविण्यात आले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचेविषयी वादग्रस्त वक्तव्य केला. याबाबत शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी जामनेरात शिवप्रेमी बांधवानी निषेध सभा व प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी राष्ट्रवादी, प्रहार जनशक्ति पक्ष, काँग्रेस, शिवसेना, बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड , मराठा सेवा संघ यांनी आपली उपस्थिती दिली. राजमाता जिजाऊ चौक , नगर परिषद समोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करुन भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध व्यक्त करुन राज्यांच्या जबाबदार व्यक्तीकडून अश्या प्रकारे विधान करणे म्हणजे त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही. राज्यपाल सारख्या व्यक्तिने असले विधान करणे चुकीचे असल्याचे उपस्थीत शिवप्रेमी यांनी निषेध व्यक्त करतांना आपल्या भावना व्यक्त केल्या. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी करुन राज्यपाल यांनी आपली संस्कृती ही दाखऊन दिली असा संताप व्यक्त करण्यात येऊन त्यांच्या पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संजय गरुड, युवक अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटिल, प्रहार जनशक्ति पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप गायके, विधानसभा क्षेत्र प्रमुख मनोज कुमार महाले, शेतकरी आघाडी चे अण्णा पाटील, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष पपू पाटील (जितेश पाटिल) भारत मुक्ती मोर्चाचे राजु खरे, शिवसेनेचे अतुल सोनवणे, भरत पवार, संभाजी ब्रिगेड चे राम अपार , मराठा सेवा संघाचे योगेश पाटील, सुनील कानडजे, विनोद पाटिल, जावेद मुल्लाजी, सईद मुजावर,
पाटील, मोहन चौधरी, संतोष झालटे, उत्तम पाटील, सचिन बोरसे, आईफज शेख, खालिद साहेब, इम्रान भाई, अनिस पहेलवान, अजमल राठोड, कैलास अपार, माधव चव्हाण, वैभव बोरसे, डॉ. बाजीराव पाटिल, प्रल्हाद बोरसे आदी उपस्थित होते.