Home क्राईम दोधे येथे विवाहितेचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

दोधे येथे विवाहितेचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

0
35

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दोधे येथील २८ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील दोधे येथील २८ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २८ फेब्रुवारी रोजी महिला घरात एकटी असतांना संशयित आरोपी सचिन रमेश मुरूमकर (वय-३५) रा. नेहता ता. रावेर याने पाणी मागितल्याचा बहाणा करून घरात घुसला. यावेळी विवाहितेचा साडीचा पदर ओढून विनयभंग केला. यावेळी विवाहितने जोरजोरात आरोळ्या मारल्याने संशयित आरोपी सचिन मुरूमकर हा फरार झाला. रात्री उशीरा रावेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सचिन रमेश मुरूमकर (वय-३५) रा. नेहता ता. रावेर याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि सचिन नवले करीत आहे.


Protected Content

Play sound