जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी येथील चेतनदास मेहता हॉस्पिटल जवळ अज्ञात तीन जणांना काहीही कारण नसतांना तरूणावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, भोलासिंग जगदीशसिंग बावरी (वय-२५) रा. शिकलकर वाडा, शिरोसोली नाका, तांबापूर हा कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास भोलासिंग बावरी हा सिंधी कॉलनीतील चेतन दास हॉस्पिटलजवळी पान टपरीव मित्र सागर हटकर आणि राम हटकर यांच्यासोबत गप्पा मारत होता. त्यावेळी अज्ञात तीन जणांनी दारूच्या नशेत येवून काहीही कारण नसतांना तिघांना भोलासिंगला बेदम मारहाण केली. यात एकाने त्याच्या हातातील धारदार शस्त्राने पोटावर वार करून गंभीर जखमी केले. अज्ञात तिघेजण दुचाकीवर बसून पसार झाले. जखमीवस्थेत भोलासिंग याला मित्र सागर हटकर आणि राम हटकर यांनी तातडीने जिल्हा शायकीय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान जखमी भोलासिंग हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या सुचनेनुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रविंद्र चौधरी, किशोर पाटील, सचिन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. भोलासिंग बावरी याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश सपकाळे करीत आहे.