Home आरोग्य ‘त्या’ महिलेचा मृत्यू ‘स्वाईन फ्लू’ मुळेच झाल्याचे निष्पन्न

‘त्या’ महिलेचा मृत्यू ‘स्वाईन फ्लू’ मुळेच झाल्याचे निष्पन्न


Swine flu 2 644x362

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी असलेल्या महिलेच्या आज सकाळी झालेल्या मृत्यूबद्दल वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार तिचा मृत्यू ‘स्वाईन-फ्लू’ ने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

शिवाजी नगरातील अमन पार्क आयशा मस्जीदीजवळ राहणाऱ्या सुफिया खान (वय ३८) या महिलेस शनिवारपासून प्रकृती बिघडल्याने एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांचे आज सकाळी निधन झाले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना स्वाईन-फ्लू झाल्याचे सांगितले असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली होती. या माहितीला सायंकाळी आलेल्या वैद्यकीय अहवालाने पुष्टी मिळाली आहे.

ऐन उन्हाळ्यात स्वाईन-फ्लू ने शहरात डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. महापालिकेने या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने युद्धपातळीवर उपाययोजना कराव्या, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound