जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नैराश्येतून तालुक्यातील कंडारी येथील ४३ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रमिला कैलास परदेशी (वय-४३) रा. कंडारी ता. जि.जळगाव असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे.
नशिराबाद पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रमिला परदेशी ह्या पती व मुलासह वास्तव्याला होते. शिवणकाम करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होत्या. रविवारी २१ फेब्रुवारी रोजी रात्री घरात कुणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीला आला. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. आपण नैराश्येतून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी नमूद कले आहे. या घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक साळुंखे तपास करीत आहेत.