जळगाव (प्रतिनिधी) पक्षी आणि मानवाचे जीवन हे एकमेकांना कसे पूरक आहे, पक्ष्यांमुळे मानवाला पावलोपावली कशी मदत होते. त्यामुळेच पक्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे कसे गरजेचे आहे. पक्ष्यांच्या किती प्रजाती आहे, जळगाव परिसरात किती प्रकारचे पक्षी आढळतात. पक्ष्यांची गणना कशी केली जाते, पक्षी गणनेची वेळ कोणती असते. सामान्य लोकही त्यात कशी मदत करू शकतात. पक्ष्यांची जीवनी कशी असते, त्यांचे संवर्धन करण्यासाठी कुठले कार्यक्रम घेतले जातात. पक्ष्यांबद्दलचे गैरसमज कोणते, कोणत्या अंधश्रद्धा पक्ष्यांसाठी घातक ठरतात. याबाबतची सर्वसमावेशक माहिती पक्षिमित्र राजेंद्र व शिल्पा गाडगीळ या पती-पत्नींनी शनिवारी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ च्या माध्यमातून सर्वसामान्यांना अत्यंत तळमळीने सांगितली. त्यांनी मांडलेल्या भावना त्यांच्याच शब्दात येथे देत आहोत.