जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवाजी नगर परिसरातील एका महिलेचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मयत महीलेचे नाव सूफिया बी शेख अखलाक (वय 38) असून खाजगी रुग्णालयात आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. दरम्यान, या संदर्भात मनपा प्रशासनाकडून कुठलाही खुलासा आलेला नाहीय.
या संदर्भात अधिक असे की, शिवाजी नगर परिसरातील अमन पार्क आयशा मशीद जवळ राहणाऱ्या सूफिया बी शेख अखलाक यांची प्रकृती शनिवार पासून खराब होती. त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी सूफिया बी यांना ‘स्वाईन फ्लू’ झाला असं सांगितल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराहटीचे वातावरण पसरले आहे. महानगरपालिकेचे आरोग्य विभागाने स्वाइन फ्लूच्या बचावासाठी उपाय योजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. दरम्यान, शेख परिवाराच्या दाव्यावर मनपा प्रशासनाकडून कुठलाही खुलासा आलेला नाहीय.