Home क्राईम तांबापुरा दंगल प्रकरणी अटकसत्र सुरू

तांबापुरा दंगल प्रकरणी अटकसत्र सुरू

0
72

जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापुरा भागात झालेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी अटकसत्र सुरू केले असून दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले आहेत.

तांबापुरा भागात काल रात्री दोन गटांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री होऊन अनेक जण घायाळ झाले आहेत. रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी हा वाद मिटवल्याने आता परिसरात शांतता आहे. दरम्यान, या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकामध्ये दोन्ही गटांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत राहूल शिवाजी हटकर ( वय२९); आकाश अशोक हटकर (वय २२); विजय राजू हटकर; गोलू छोटू हटकर; भावडू उर्फ भाऊसाहेब शांताराम सुरंगे; बारकू मन्साराम हटकर; रवींद्र अर्जुन गर्दे; आकाश बबन हटकर; अमोल कैलास पिसे; बंडू शंकर हटकर यांना अटक करण्यात आली आहे. तर रवी राजू हटकर; बबलू बापू हटकर; सागर बापू हटकर; राकेश धनराज हटकर; भुर्‍या धोबी, दीपक समाधान हटकर; राजू हटकर; गोपाळ अंकुश हटकर; संजय अशोक हटकर; प्रकाश पारधी; विशाल हटकर; कैलास नथ्थू भोई व जिभाऊ उत्तम हटकर यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, दुसर्‍या गटातील संशयितांवरही गुन्हा नोंदविण्याचे काम औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकात सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound