यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावल शहरात एका भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवार १४ फेब्रुवारी रोजी दुपारी शाळेत जाण्यासाठी निघाली त्यानंतर ती घरी आलीच नाही. यानंतर तीच्या आईवडीलांनी व नातेवाईकांनी शोधाशोध केली. परंतू मुलगी कुठेही आढळून आली नाही. अखेर त्यांनी यावल पोलीसात धाव घेवून अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर करीत आहेत.