मुंबई प्रतिनिधी । सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज सकाळी सात वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला असून यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणास लागली आहे.
आज सकाळी सात वाजेपासून चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे. यात देशभरातील ७१ जागांचा समावेश असून यात महाराष्ट्रातील १७ जागांचा समावेश आहे. राजकीयदृष्ट्या यातील बहुतांश लढतील या अतिशय महत्वाच्या असल्यामुळे यातील निकाल हे सत्तेचा कौल ठरविण्यासाठी निर्णायक ठरणार आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या टप्प्यातील निवडणुकीत अनेक बिग फाईटस् या आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरल्या आहेत.
हा राज्यातील शेवटचा टप्पा असून यात नंदुरबार (अनुसूचित जमाती), धुळे, दिंडोरी (अ.ज.),नाशिक, पालघर (अ.ज.),भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य,मुंबई दक्षिण, मावळ,शिरुर आणि शिर्डी (अनुसूचित जाती) या लोकसभा मतदारसंघत मतदान होत आहे. या दरम्यान, कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये यासाठी प्रशासन काळजी घेत आहे.