Home Cities जामनेर जामनेरात काँग्रेसतर्फे डॉ. ऐश्वर्या राठोड यांचा सन्मान

जामनेरात काँग्रेसतर्फे डॉ. ऐश्वर्या राठोड यांचा सन्मान

0
40


जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राज्यात प्रथम क्रमांकाने काँग्रेस सदस्य नोंदणी हे डिजिटल पद्धतीने केल्याबद्दल जळगाव जिल्हा महिला सेवादल जिल्हाध्यक्ष डॉ. ऐश्वर्या राठोड यांचा प्रदेश काँग्रेस च्या वतीने सन्मान करण्यात आला.

मुंबई येथे काँग्रेस पक्ष कार्यालयांमध्ये काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एम राजू व प्रभारी एस के पटेल यांच्या हस्ते संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून डिजिटल पद्धतीने काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी करणाऱ्या जळगाव जिल्हा महिला सेवा दल जिल्हा अध्यक्ष डॉक्टर ऐश्वर्या राठोड यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार प्रणिती शिंदे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जळगाव योगेंद्र पाटील, सेवादल प्रदेशाध्यक्ष विलास अवताडे, जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार आदी उपस्थित होते. डॉक्टर ऐश्वर्या राठोड हे नेहमी काँग्रेस पक्ष वाढीसाठी चांगल्या प्रकारे विविध उपक्रम राबिवता. त्याच बरोबर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या मदत करीत असून विविध योजना मिळवून देण्यासाठी सहकार्य करीत असतात. त्यांच्या या कामाची दखल घेऊन वेळोवेळी काँग्रेस पक्षातर्फे त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. या सन्मानाबद्दल प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले की, आपण यापुढेही सर्वसामान्य जनतेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून जर गोरगरीब जनतेवर अन्याय होत असेल तर त्यांच्यासाठी तीव्र आंदोलन छेडू अशी माहिती प्रतिनिधीशी बोलताना डॉक्टर ऐश्वर्या राठोड यांनी दिली.


Protected Content

Play sound