यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील डोणगाव येथे कुलस्वामीनी एकविरा माता मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा सोमवार दि.१४ फेब्रूवारी रोजी आयोजीत केला आहे.
या प्राणप्रतिष्ठा सोहळयाच्या कार्यक्रमाआधी रविवार दि.६ फेब्रुवारी रोजी एकविरा माता मंदीर देवपुर धुळे येथून पहाटे ५:१५ वाजता ज्योत घेऊन निघेलेल्या डोणगाव येथील ३० ते ३५ तरूणांनी पायी चालत ज्योत (मशाल) दुपारी २ वाजता ‘डोणगाव’ येथे आणली यात सार्थक सुरेश पाटील (वय २० वर्षे) या तरूणाने ‘धुळे ते अमळनेर’ तब्बल ४५ कि.मी.पर्यत धावत ही ज्योत आणली म्हणून या तरूणाचे विशेष कौतुक होत आहे .
शनिवार दि.१२ पासून सुरू होत असलेल्या या सोहळ्यात प्रधान संकल्प, शोभा यात्रा, गणपती पूजन, स्वस्ती पुण्याह वाचन, ध्यान निवास, पिठ स्थापन, जलाध वास सांय पूजन, आरती व रविवार दि.१३ रोजी प्रातःपूजन, अग्नी स्थापन, ग्रह हवन, प्रधान देवता हवन, सांय पूजन, आरती तर सोमवार दि.१४ रोजी प्रातःपूजन प्रधान देव स्वपन प्राणप्रतिष्ठा, मुर्तीन्यास स्थापित देवता हवन, पूर्णाहुती व सकाळी ११ वाजेपासून महाप्रसादाच्या कार्येक्रमाचे आयोजन केले आहे.
सर्व भाविकांनी आई एकविरा माता मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाच्या कार्येक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ‘डोणगाव’ येथील ग्रामस्थांनी केले आहे.