डॉ. कुंदन फेगडे आयोजित ई – श्रम कार्ड नोंदणी अभियानास परसाडे ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद (व्हिडिओ)

यावल लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातीत परसाडे येथे युवा सामाजिक कार्यकर्त डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या मोफत ई-श्रम कार्ड वितरणाचे महाअभियान आता आठव्या टप्प्यात पोहोचले असून या समाज विधायक उपक्रमास पडसाडे या आदिवासी गावातील ग्रामस्थांचा उत्तम असा प्रतिसाद हा मिळत आहे.

 

यावल तालुक्यातील पडसाडे गावातील आदिवासी ग्रामस्थांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभासह संकटासमयी आरोग्य विषयी तात्काळ लाभ मिळावा, याकरीता श्रमजिवी कुटुंबास अत्यावश्यक असणारे ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियानास आठव्या सत्राला परसाडे येथुन प्रारंभ करण्यात आला. हे अभियान गावातील ग्रामपंचायत जवळच्या परिसरात पार पडले. यावेळी या महाअभियानास एकूण ४७९ लाभार्थ्यांनी आपल्या नांवांची नोंदणी करीत ई-श्रम कार्ड मिळवण्याचा लाभ घेतला. परसाडे गावात झालेल्या या मोफत ई -श्रम कार्ड अभियानाचे उद्घाटन गावातील आदिवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच हुसेन तडवी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. कुंदन फेगडे, रमेश सावळे, राष्ट्रपती पुरस्कार व राज्य शासनाचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार व आदि पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक मजीद अरमान तडवी, उपसरपंच रुस्तुम तडवी , राजू तडवी, मिनाताई तडवी, पोलीस पाटील मेहमूद तडवी, , सुलमान तडवी, रमेश सावळे, कमाल तडवी, अशरफ तडवी, फिरोज तडवी, मेहमूद तडवी, बबिता तडवी, दिपक पाटील, एकनाथ भालेराव, सलीम तडवी, इनुस तडवी, छबीर तडवी आदींची उपस्थिती होती. या समाज उपयोगी उपक्रम अभियानास यशस्वी करण्यासाठी आयोजक डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर लोहार, मनोज बारी, विशाल बारी, हर्षवर्धन मोरे, अक्षय राजपूत, जयवंत माळी, चेतन कापुरे, शुभम सोनवणे यांचे योग्य सहकार्य लाभले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/637010934290620

Protected Content