पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाचे ‘अर्थशास्त्र’ विषयाचे प्राध्यापक श्रावण बाबूलाल (एस. बी.) तडवी यांना बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडुन पी.एच.डी. पदवी प्राप्त झाली आहे.
प्रा.एस.बी.तडवी यांनी ‘महाराष्ट्रातील तडवी, भिल्ल जमातीच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा विशेष अभ्यास’ (कालखंड सन – १९९० ते २०१०) यावर अभ्यास केला होता.
प्रा.श्रावण तडवी यांच्या यशाबद्दल त्यांचे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन विलास जोशी, सचिव अॅड. महेश देशमुख, पाचोरा पिपल्स बॅंकेचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.भागवत महालपूरे, प्राचार्य डॉ.वासुदेव वले, उपप्राचार्य प्रा.जे.व्ही.पाटील यांनी अभिनंदन केले आहे.