जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील तांबापुरा भागात एका अल्पवयीन मुलावर चौघांनी हल्ला चढविल्याने तो जखमी झाल्याची घटना घडली आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, काल रात्री आठ वाजेच्या सुमारास शादाब गफार मन्यार (वय १६) या अल्पवयीन मुलास समीर व सहील यांच्यासह चौघांनी घरातून बाहेर बोलावून त्याला जबर मारहाण केली. यात तो जखमी झाला आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली असून रात्री उशीरापर्यंत याबाबत गुन्हो नोंदविण्याचे काम सुरू होते.
तर या हल्ल्यात जखमी झालेल्या शादाब मन्यार याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यात चौघांनी शादाबवर चॉपरने वार केल्याची माहिती त्याच्या आप्तांनी दिली आहे.