दिनेश लाड यांना पीएचडी पदवी प्रदान

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सहायक मुळ धुळे येथिल रहिवाशी दिनेश लाड यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

दिनेश सुभाष लाड यांनी वाणिज्य व व्यवस्थापन या विद्याशाखेंतर्गत ‘इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन, लिब्रलायझेशन अॅण्ड प्राव्हेटॉझेशन ऑन लाईफ इन्शुरन्स सेक्टर इन इंडिया’ या विषयात प्रा.डॉ.दिनेश द्वारकादास भक्कड, एस.पी.डी.एम. महाविद्यालय, शिरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली कबचौउमवि,जळगाव विद्यापीठात शोधनिबंध सादर केला. त्यांच्या यशाबद्दल प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन, प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार, प्रभारी कुलसचिव प्रा.आर.एल.शिंदे, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.डी.एस.दलाल, उपकुलसचिव व्ही.व्ही.तळेले तसेच विद्यापीठातील अधिकारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

 

Protected Content