Home क्राईम जळगावात धूमस्टाईन महिलेची मंगलपोत लांबविली

जळगावात धूमस्टाईन महिलेची मंगलपोत लांबविली

chain snatching

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील ईश्वर कॉलनीत महिलेच्या गळ्यातील ३५ हजार रूपये किंमतीच मंगलपोत दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी धूमस्टाईल लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल संजय रोकडे (वय-५२) रा. ईश्वर कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे.  बुधवारी ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास  कामानिमित्ताने त्या घराबाहेर गेल्या होत्या. काम आटोपुन पुन्हा घराकडे परतत असतांना समोरुन भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीवरील दोघांनी शीतल रोकडे यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची मंगलपोत तोडुन नेली. काही कळण्याच्या आत दुचाकीस्वार दोघे भरधाव वेगाने निघून गेले. त्यानंतर रोकडे यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री १० वाजता तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे हे करीत आहेत.

 


Protected Content

Play sound