पहूर येथे दोन मोटारसायकलींची चोरी

पहूर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जाधव मार्केट येथील दुकानासमोरून एकाच्या ३५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. या संदर्भात पहूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, शांतीलाल रामदास जाधव (वय-५६) रा. जाधव मार्केट पहुर यांचे हे शेतकरी असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. ३ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दुकानासमोर त्यांच्या मालकीच्या (एमएच १९ एए ४३२८) आणि (एमएच बीटी १९ ७६९६) या क्रमांकाच्या दोन मोटारसायकली त्यांच्या दुकानासमोर पार्किंग करून लावल्या होत्या. दुसऱ्या दिवशी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांच्या  दोन्ही मोटरसायकली जागेवर ती दिसून आल्या नाहीत. त्यांनी परिसरात शोधाशोध केली, मात्र दोन्ही मोटरसायकली कोठेही आढळून आले नाही. याबाबत पहूर पोलिस स्टेशनमध्ये शांतीलाल जाधव यांनी धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पहूर पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र देशमुख करीत आहे.

 

Protected Content