यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ‘सावखेडा सिम ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्तीमधील शौचालय व भुयारी गटारीच्या कामाची चौकशी करा’ अशी मागणी सुनिल भालेराव यांनी गटविकास अधिकारी नेहा भोसले यांच्याकडे केली आहे.
तालुक्यातील ‘सावखेडा सिम’ येथील ग्राम पंचायतच्या माध्यमातून विविध विकास कामांच्या निधीतून शौचालय आणि भूमिगत गटारींचे बांधकाम सुरू असून सदरचे काम हे अत्यंत निकृष्ठ प्रतिचे होत असल्याची तक्रार साम्माजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य सुनिल भालेराव यांनी गटविकास अधिकारी नेहा भोसले यांच्याकडे केली आहे .
या संदर्भात सुनिल नथ्यु भालेराव यांनी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सावखेडा सिम तालुका यावल येथील ग्राम पंचायतच्या माध्यमातुन शासकीय योजनेतून सुमारे ८ लाख रुपये निधी खर्चातून दलीत वस्तीमध्ये शौचालय आणि भुयारी गटार बांधकाम हे संबधीत ठेकेदार हे निविदाप्रमाणे साहित्य वापरत नसल्याने सदरचे काम हे अत्यंत निकृष्ठ प्रतिचे होत आहे.” असे निवेदनात म्हटले असून पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी तात्काळ या कामाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.