Home Cities जळगाव जळगावात तब्बल ५०० किलो रंगोळीतून साकारली “लतादीदींची” प्रतिकृती (व्हिडिओ)

जळगावात तब्बल ५०० किलो रंगोळीतून साकारली “लतादीदींची” प्रतिकृती (व्हिडिओ)

0
28

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गानकोकीळा स्व. लता मंगेशकर यांना ओजस्विनी कला महाविद्यालयाने ५०० किलो रांगोळीतून साकारलेल्या प्रतिकृतीतून आदरांजली अर्पण करण्यात आली.

 

ओजस्वीनी कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ४० बाय ४० या आकारात साकारलेल्या या भव्य रांगोळीच्या प्रतिकृतीत पांढरा आणि काळ्या रंगाचा वापर केला आहे. लतादीदी या भारताचे भूषण असल्याने यात तिरंगा ध्वज देखील साकारण्यात आला आहे. ही भव्य रांगोळी ५ शिक्षक आणि विद्यार्थी यांनी २४ तासाच्या अथक प्रयत्नानंतर पूर्णत्वास आली. रांगोळीची संकल्पना ओजस्विनी कला विभागाचे विभागप्रमुख प्रा. मिलन भामरे, प्रा. पुरुषोत्तम घाटोळ, प्रा. पियुष बडगुजर, प्रा. डिगंबर शिरसाळे, प्रा. राजेंद्र सरोदे यांची आहे. रांगोळी रेखाटण्यात भूषण पाटील, आयुषी जैन, लक्षिता जैन, कुणाल जाधव, रिटा घुगे, सागर चौधरी, ईशा भावसार, जोती सहानी यांनी सहकार्य केले. या उपक्रमासाठी के. सी. ई. चे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, मु.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य स. ना. भारंबे, सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वदोडकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी जनसंपर्क अधिकारी प्रा. संदीप केदार, प्रा. देवेंद्र गुरव, प्रा. कपिल शिंगाने, प्रा. केतकी सोनार, संजय जुमनाके आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/479044537124185


Protected Content

Play sound