यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत त्यांना झेड सुरक्षा मिळावी, अशी मागणीचे निवेदन एमआयएमच्या वतीने तहसीलदार महेश पवार यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्या उत्तर प्रदेश येथे दि.३ फेब्रुवारी रोजी जिवे ठार माण्याचा प्रयत्न केला गेला. या हल्लाची पूर्णपणे निदा करुन, हा भ्याड हल्लाची चौकशी करावी. ह्या हल्ल्यामध्ये जे कोणी समाविष्ट असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, सोबतच संपुर्ण देशाच्या आवाजाला समोर ठेवता आणि मोठा संविधान रक्षक आणि कायद्याद्या अधीन राहुन, आमचे नेते एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांना झेड-सुरक्षा देण्यात यावी आणि त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा मागणी पुर्ण न झाल्यास तहसील कार्यालयासमोर मोठे आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर आबीद खान युनुस खान, वसीम खान तय्युब खान, वाजीद खान सलीम खान, साजीद खान हाफीज खान, छाया कदम, युसूफ खान अय्युब खान, शेख वसीम शेख जमील, अन्वर शेख रहेमत शेख, कपील खान जाकीर खान, शेख मुन्ना शेख मुशीर, तन्वीर खान मोहम्मद खान, हनीफ खान हमीद खान, रहिम खाटीक, सलीप पटेल यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.