जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात ५३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ४०९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोरोना ओसरत असल्याचे आलेख मिळालेल्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे.
तालुका निहाय आकडेवारी
जळगाव शहर-१२, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-१, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-१२, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-१८, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-२, चाळीसगाव-२, मुक्ताईनगर-५, बोदवड-० असे एकुण ५३ कोरोना बाधित रूग्ण आज आढळून आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ३५७ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४७ हजार ७४६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५९० रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे आता सध्या १ हजार २१ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.