जळगाव (प्रतिनिधी) चिंचोली येथील ३१ वर्षीय व्यक्ती कामानिमित्त गितांजली एक्सप्रेसने जळगावकडे येत असताना शिरसोलीजवळ रेल्वेतून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला आहे. रेल्वे पोलिसांनी तातडीने जखमीस जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत माहिती अशी की, लक्ष्मण पितांबर शेळके (वय ३१) रा. चिंचोली तालुका जळगाव हा खाजगी कामानिमित्त गितांजली एक्सप्रेसने जळगावकडे येत असताना शिरसोली जवळील रेल्वे खांबा क्रमांक ४१७ जवळ सकाळी १०.०० वाजता रेल्वेतून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला असून त्याचा उजवा हातही मोडला आहे.
रेल्वे गँगमनने दिलेल्या माहितीवरून रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने जखमीस जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. पुढील तपास रेल्वे पोलिस कर्मचारी करीत आहेत.