Home क्राईम मोटारसायकल पाठीमागून रिक्षावर आदळल्याने दोघे जखमी

मोटारसायकल पाठीमागून रिक्षावर आदळल्याने दोघे जखमी


accident clipart scooter accident 9

जळगाव (प्रतिनिधी) पुढे चालणाऱ्या रिक्षाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येत असलेली दुचाकी रिक्षावर आदळून झालेल्या अपघातात खाली पडल्याने दोघेजण जखमी झालेआहेत.

 

याबाबत माहिती अशी की, सुनील रामदास पवार (वय २०) आणि विकी सुरेश पवार (वय १८) (दोघे रा. रायपूर) यांनी एका मित्राला कुसुंबा येथील एफसीआय गोडाऊन जवळ कामावर सोडल्यानंतर पुन्हा दुचाकीने ते जळगाव शहराकडे येत असताना पुढे चालत असलेल्या रिक्षाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणारी त्यांची दुचाकी रिक्षावर आदळली त्यात सुनिल व विकी खाली पडले यात सुनीलच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे तर विकी किरकोळ जखमी झाला आहे. दोघांना खाजगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून याबाबत पोलिसात कुठलीही नोंद झालेली नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound