Home आरोग्य ठाकरे सरकारच्या निर्णयाविरोधात वरणगावात भाजपाचे आंदोलन

ठाकरे सरकारच्या निर्णयाविरोधात वरणगावात भाजपाचे आंदोलन

0
32

वरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ठाकरे सरकारने सुपर शॉपी व किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीस परवानगी दिली आहे. या निर्णयाविरोधात आज भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील बस स्टँड चौकामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.

ठाकरे सरकारने सुपर शोपी मॉल व किराणा दुकानांमध्ये वाईन  विकण्याचा निर्णय घेतलेला आहे, याच्या निषेध नोंदविण्यासाठी भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील बस स्टँड चौकामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. घेतलेला हा निर्णय त्वरित मागे घ्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या वेळी देण्यात आला आहे.

 


Protected Content

Play sound