मुक्ताईनगर येथील खडसे महाविद्यालयात महात्मा गांधी यांना अभिवादन

मुक्ताईनगर प्रतिनिधी । शहरातील खडसे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

 

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच. ए.महाजन यांनी महात्मा गांधीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  देशभर महात्मा गांधी यांची पुण्यतिथी, शहीद दिवस म्हणून संपन्न करण्यात येत आहे.  प्रमुख उपस्थिती म्हणून ग्रंथालयाचे अधीक्षक प्रा  सरोदे, राष्ट्रीय महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. छाया ठिंगळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दीपक बावस्कर, प्रा. विजय डांगे आणि गणेश शिमरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे  संपूर्ण संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अनिल पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा, संजीव साळवे आणि क्रीडा संचालिका प्रतिभा ढाके यांनी केले.

Protected Content