पारोळा, प्रतिनिधी | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे २६ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या राज्य पात्रता चाचणी ( सेट ) परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल प्रियंका राजेंद्र बोरसे हिचा सत्कार स. ध. भावसार यांनी केला.
प्रियांका बोरसे हिने सेट परीक्षेत यश संपादन केले असून तिचा राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी आपल्या निवासस्थानी बोलावून शाल, पुष्पगुच्छ, अभिनंदन पत्र, गौरव पत्र व रोख बक्षीस रु. २५०/- देऊन भावपूर्ण सत्कार केला. यावेळी श्री. भावसार यांनी प्रियांका बोरसे हिस पुढील वाटचाल व उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. प्रियंका ही पारोळा येथील गजानन माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक राजेंद्र बोरसे यांची सुकन्या आहे.