नवी दिल्ली-उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलवर 10 फेब्रुवारी ते 7 मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. वृत्तपत्रे किंवा वृततवाहिन्यांवर कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल किंवा मतदारांचे सर्वेक्षण प्रसारीत करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी अजयकुमार शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 10 फेब्रुवारी सकाळी 7 वाजेपासून ते 7 मार्च संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल प्रसारीत करण्यास बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रिंट मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल किंवा मतदार सर्वेक्षण प्रसारीत करू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी कारवाई संबंधितांवर करण्यात येऊ शकते, असे शुक्ला यांनी सांगितले.