जामनेर प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. त्यामुळे त्यांना जीवन जगणे कठीण झाले असून त्यांना एक मदतीचा हात म्हणून जामनेर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त घरात लागणाऱ्या सर्व संसारोपयोगी किराणा साहित्याचे कर्मचाऱ्यांना वाटप केले आहे.
त्याचबरोबर मार्क्स वाटप करण्यात आले असून येणाऱ्या काळातही एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वस्वी मदत करू, अशी ग्वाही कार्यक्रमात बोलताना सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी कर्मचाऱ्यांना दिली आहे. यावेळी राजेंद्र पाटील, पवन लोढा, प्रकाश सैतवाल, भानुदास चव्हाण, सुनील पाटील, श्रीकांत पाटील यांच्यासह दुखवत्यात सामील असलेल्या एसटी कर्मचारी व पदाधिकारी संपकरी वाहक-चालक यावेळी उपस्थित होते.




