जळगाव प्रतिनिधी | डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले १८ वर्षावरील नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी हा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील तिसर्या व सहाव्या सत्राचे विद्यार्थी खुशी शिरसाट, यशवंत बोरुडे यांनी मतदार नोंदणी करावयाची माहिती, मतदानाचे महत्त्व अशा वेगवेगळ्या विषयावर प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थांना माहिती आपल्या मनोगतातून दिली. त्यावेळी कार्यक्रमास उपस्थित कृषी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी तसेच सर्व प्राध्यापक वृंदा कडून मतदान शपथ घेण्यात आली. त्यानंतर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे यांनी मतदानाविषयी सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमास प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, उपप्राचार्य प्रा. पी एस देवरे, शिक्षण प्रभारी एस. एन पाटील, साक्षरता निवडणूक मंडळाचे नोडल अधिकारी तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. आर डी चौधरी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. एस. राणे, व सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरिराज कणखरे तर आभार प्रदर्शन पवन काळे या विद्यार्थ्यांनी केले.