जळगाव प्रतिनिधी | राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात २५ जानेवारी रोजी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात आली. मतदार दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात सुबक रांगोळी काढण्यात आली. तसेच व्याख्यानही संपन्न झाले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संदर्भीय पत्राद्वारे ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक’ यांच्या आदेशान्वये मंगळवार, २५ जानेवारीला गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात ‘राष्ट्रीय मतदान दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी १८ वर्षे पूर्ण केलेल्या महाविद्यालयीन नवतरुण मतदारांचा मतदान यादीत समावेश करणे व त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश्य होता. त्यानुसार नर्सिंग महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य मौसमी लेंढे, उपप्राचार्य मेनका एस.पी. यांच्यासह प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक विद्यार्थी यांची उपस्थीती होती. याप्रसंगी उपस्थीतांनी आपआपले निवडणूक कार्य हातात घेऊन शपथ घेतली. सभागृहातील सहभागींनी मास्कसह सोशल डिस्टन्स राखू कोविड नियमांचे पालन करण्यात आले.