Home Cities चाळीसगाव बुलढाणा जिल्ह्यातील ५५ वर्षीय प्रौढ बेपत्ता

बुलढाणा जिल्ह्यातील ५५ वर्षीय प्रौढ बेपत्ता

0
44

पाचोरा प्रतिनिधी | बुलढाणा जिल्ह्यातील ‘भिलवाडा’ येथील ५५ वर्षीय रामकृष्ण धोंडो पवार हे चाळीसगाव ते जळगांव दरम्यान बेपत्ता झाले आहेत. त्यांचा मुलगा प्रभाकर पवार याने रेल्वे पोलीसात मिसिंग तक्रार दाखल केली असून या संदर्भात कोणास काहीही माहिती असल्यास संपर्क साधावा असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील भिलवाडा येथील रामकृष्ण धोंडो पवार (वय – ५५) हे त्यांचा मुलगा प्रभाकर रामकृष्ण पवार व त्यांच्या पत्नी हे मुंबई येथुन अमरावती एक्स्प्रेसने अमरावती येथे जाण्यासाठी निघाले असता चाळीसगाव ते जळगांव दरम्यान रामकृष्ण धोंडो पवार हे अचानकपणे बेपत्ता झाल्याने त्यांचा मुलगा प्रभाकर पवार याने रेल्वे पोलिसात दि. २२ जानेवारी रोजी मिसिंग तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी या घटनेचा पुढील तपास ए. पी. आय. किसन राख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ईश्वर बोरुडे हे करीत असून रामकृष्ण धोंडो पवार यांचे विषयी कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक ९०२८१ ५२९६७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ही प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound