जळगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र कमांडो फाउंडेशन संचलित रेस्क्यू कमांडो फोर्सच्या उत्तर महाराष्ट्र कमांडो विभाग प्रमुखपदी प्रदिप पाटील यांची निवड करण्यात आली आहे. नुकतेच त्यांना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख संतोष वायदंडे , तसेच सांगली जिल्हा प्रमुख अभिजित नलवडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
महाराष्ट्र कमांडो फोर्स महाराष्ट्रभरात आपत्कालीन पथक म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्र शासन प्रस्तावित महाराष्ट्रातील धार्मिक मंदिरे, पुर नियंत्रण , इलेक्शन ड्युट्या , बंदोबस्त व इतर संभाव्य येणाऱ्या आपत्ती ठिकाणी आवश्यकतेनुसार महाराष्ट्र पोलिसदल व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून कमांडोज कार्य करीत आहेत. महाराष्ट्र कमांडो फोर्सचे अध्यक्ष मनोज राऊत व महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख संतोष वायदंडे तसेच सांगली जिल्हा प्रमुख अभिजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक व बौद्धिक चाचणी घेऊन उत्तर महाराष्ट्रातील १६ मुलांचे निवड करण्यात आली आहे. यात राकेश माळी , सुभाष राठोड, नितीन पवार, कल्पेश मराठे, इंद्रसिंग पाटील, विशाल शिंदे, पृथ्वीराज सुर्यवंशी, प्रतिक पवार, दिपक महाले, विशाल पाडवी, दीपक पाचपांडे, महेंद्रसिंग चौधरी, योगेश महाले, सुरेश गावीत, सुनील राठोड यांचा समावेश आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्र कमांडो विभाग प्रमुखपदी प्रदिप पाटील यांची नेमणुक करण्यात आली आहे.