जळगाव प्रतिनिधी । मेहरूण तलावावर तिघे मित्र बसलेले असतांना मागावून दुचाकीने आलेल्या दोघांनी तिघांना मारहाण केल्याची घटना 23 फेब्रुवारी रोजी घडली होती. या मारहाणी प्रकरणातील एका संशयितास एलसीबीने अटक केली होती, आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याला 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रसाद भाऊसाहेब पाटील याचा वाढदिवस 23 फेब्रुवारी 2019 रोजी होता. त्यानिमित्ताने प्रसादसह पल दिलीप लोटवाला आणि अदित्य हे दोघे मित्र मेहरूण तलावावर पार्टी केली. त्यांना मेहरूणकडून रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घरी परतत असतांना आरोपी दिपक भगवान माळी (वय-23) रा.जाकिर हुसेन कॉलनी यांच्यासह एकजण दुचाकीने आला. प्रसाद पाटील याला धमकावून तुमच्य खिश्यात जे काही आहे ते द्या असे सांगत दोघांना जिवे ठार मारण्याची धमकीही दिली होती. यावेळी दोघांनी तिघांकडून दुचाकीची चावी घेत खिश्यातून दोन मोबाईल आणि चार आणि 10 हजार रूपये काढून फरार झाले होते. याप्रकरणी पल लोटावाला यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 25 एप्रिल रोजी आरोपी दिपक माळी हा जॉकीर हुसेन कॉलनीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या सुचनेनुसार पोहेका विजय पाटील, रविंद्र गिरासे, चंद्रकांत पाटील, विजय पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारूळे, विकास वाघ, मिलींद सोनवणे, सचिन महाजन, इंद्रिस पठाण आणि गफुर तडवी हे सर्वजण हुसेन कॉलनीत जावून आरोपी दिपक माळी हनुमान मंदीराजवळ उभा असतांना ताब्यात घेतले. आरोपी दिपक माळी याला न्या. श्रीमती एम एम चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता आरोपीकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तपास तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, जितेंद्र राजपूत, रतिलाल पवार करत आहे.