यावल प्रतिनिधी | तालुक्यातील पथराडे गावातील चिमकुल्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानासाठीच्या अगंणवाडीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून ग्रामपंचायत सदस्य प्रताप सोनवणे यांच्या हस्ते अंगणवाडीचे भूमिपूजन करण्यात आले.
यावल तालुक्यातील पथराडे या गावी अंगणवाडीसाठी इमारत नसल्यामुळे गावातील जिल्हा परिषदच्या जुन्या मराठी शाळेच्या इमारतीमध्ये बालकांचे शिक्षण सुरु होते. गावाच्या सरपंच योगीता सोनवणे यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने सातत्याने प्रयत्न व पाठपुरवठा करुन नवीन अंगणवाडीची इमारत बाधकामासाठी आवश्यक निधीला मंजुरी मिळवण्यात यश मिळवले. या अंगणवाडीच्या इमारतीचे भूमिपूजन आज करण्यात आले.
यावेळी उपसरपंच भारती सोळंके, दिनकर धिवर, ग्रामसेवक भरत पाटील, गणेश धिवर, गोविंदा धिवर, प्रकाश भालेराव, चंद्रकांत धिवर, साकळी येथील सैय्यद तैय्यब ताहेर, जाकीर भाई, आझाद भाई, आशा सेविका माया धिवर, वंदनाबाई धिवर, उषाबाई धिवर, दुर्गाबाई धिवर, वैशालीबाई धिवर, मिराबाई धिवर, राधिकाबाई धिवर आदी. उपस्थित होते.