जामनेर प्रतिनिधी | राष्ट्रीय युवा दिन व स्वामी विवेकानंद जयंतीचं औचित्य साधून सरकारने दिलेल्या वाहतुकीच्या नवीन नियमाची सर्व सामान्याला माहिती होण्यासाठी ‘युथ एज्युकेशन वेलफेअर सोसायटी जळगाव’ जिल्ह्यासहित ‘जामनेर’मध्ये ‘वाहतूक सजगता मोहीम’ पोलीस स्टेशन व वाहतूक पोलिसांच्या सहकार्यने राबवत आहे.
गेल्या महिन्यात जामनेर तालुका दोन भीषण आपघातून हादरून गेला होता. त्यात सहाजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अतिवेगाने चालणाऱ्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हे अपघात झाले होते. काहीजनाच्या या चुकीमुळे देशात असे किती आनंदी संसार हे उद्वस्त होतात.
देशातील रस्ते अपघातांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचे द्वितीय स्थानावरील सातत्य कायम असून गेल्या वर्षभरात एकूण अपघातांपैकी १३ टक्के अपघात राज्यात झाल्याचे चित्र भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या परिवहन संशोधन शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या अहवालातून समोर आले आहे.
अतिवेगामुळे वाहनावरचा ताबा सुटणे, दारू पिऊन गाडी चालवणे, समोरून गाडी येत असूनही ओव्हरटेक करणे, धोकादायक वळणावर वेगाने गाडी चालवणे, पार्किंग लाईट न लावता महामार्गावर गाडी थांबवणे, अशा अनेक कारणांमुळे अपघात होतात. अनेक उपाययोजना राबवूनही राज्यात अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाही.
अशा गोष्टीवर उपाय म्हणून व सरकारने दिलेल्या वाहतुकीच्या नवीन नियमाची सर्व सामान्याला माहिती होण्यासाठी ‘स्वामी विवेकानंद’ यांच्या विचारावर चालणारी ‘युथ एज्युकेशन वेलफेअर सोसायटी जळगाव’ जिल्ह्यासहित ‘जामनेर’मध्ये ‘वाहतूक सजगता मोहीम’ राष्ट्रीय युवा दिन व स्वामी विवेकानंद जयंतीचं औचित्य साधून पोलीस स्टेशन व वाहतूक पोलिसांच्या सहकार्यने राबवत आहे.
त्या माध्यमातून शाळा, महाविध्यालय, राजकीय पक्ष व कार्यकर्ते, पत्रकार बंधू, गणेश मंडळ व युवक मंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवाकांपर्यंत व जनतेपर्यंत “वाहतूक जनजागृती मोहीम प्रत्यक्ष आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून युथ एज्युकेशन महाराष्ट्र राज्य राबवणार आहे.
त्याची माहिती आज ‘युथ एज्युकेशन’चे अध्यक्ष नितीन सुराणा यांनी पोलीस अधीक्षकांना देऊन त्याच्या हाताने आज वाहतूक सजगता मोहीमेची सुरवात ही वाहतूक सजगता मोहिमेच्या शपथ पत्रिकेच्या विमोचनाने केली. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी युथ एज्युकेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले.
जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरक्षक, किरण शिंदे यांना शपथ पत्रिका व आभार पत्र भेट देऊन या उपक्रमाची सुरवात आज जामनेरमध्ये करण्यात आली. “युवा वर्गानी आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या संदेशाद्वारे जनजागृती करावी, वाहतुकीच्या नियमाचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे.” असे आवाहन या वेळी करण्यात आले.