जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा हुडको येथे घरगुती भांडणातून मुलाने आईला चाकू मारुन जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलाविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की शमीम बानो शेख पिरन (वय ४०) या महापालिकेच्या दवाखान्याच्या मागे पिंप्राळा हुडकोत राहतात. याच ठिकाणी त्यांचा मुलगा तन्वीर शेख जलील (वय २३) हा सुध्दा राहतो. रविवार ९ जानेवारी रोजी घरगुती भांडणाच्या कारणावरून तन्वीर याने आई शमीम हिच्या उजव्या हातावर भाजी कापण्याचा चाकू मारून दुखापत केली. तसेच मारून टाकण्याची धमकी दिली. अशा आशयाच्या शमीम बानो शेख पिरन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांचा मुलगा तन्वीर शेख जलील याच्या रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहेत